पुण्यातील सोसायटीत घडलं असं काही… गाडीखाली आला निष्पाप जीव; पुढे काय झालं?


पुणे : पुणेमध्ये मुक्या प्राण्यांच्या सुरक्षेबाबत एक महत्त्वाची कायदेशीर कारवाई समोर आली आहे. विश्रांतवाडी परिसरातील एका सोसायटीमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत पाळीव मांजराच्या पिलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

या प्रकरणी पोलिसांनी संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांसाठी हा एक गंभीर इशारा मानला जात आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, टिंगरेनगर येथील तिरुपती सोसायटीमध्ये मंगळवार, 17 मार्च रोजी सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. येथील रहिवासी असलेल्या 42 वर्षीय तक्रारदार महिलेचे पाळीव मांजराचे पिल्लू सोसायटीच्या आवारात फिरत असताना, त्याच वेळी एका भरधाव वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात त्या पिलाचा जागीच मृत्यू झाला. आपल्या लाडक्या मांजराच्या पिलाचा मृत्यू झाल्याने धक्का बसलेल्या महिलेने तातडीने विश्रांतवाडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक माने या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक पुरावे गोळा करण्यात येत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!