कर्ज घेण्यासाठी काहीजण येतील, दादांशी बोलणे झाले असे सांगतील, माझ्यासोबत फोटो दाखवतील, पण कर्ज देऊ नका..!! कागद बघा, अजितदादा असं का म्हणाले?
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या वेगळ्या स्वभावासाठी ओळखले जातात. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते युनियन बँकेचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, तुमच्याकडे कर्ज घेण्यासाठी काही जण येतील. आत्ताच दादांशी फोनवरून बोलणे झाले असे सांगतील. काही जण माझ्यासोबतचे फोटो दाखवतील.
पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. कागदपत्रे क्लिअर असतील तरच त्यांना कर्ज द्या. असंही ते म्हणाले. तसेच अधिकाऱ्याकडे पाहून हिंदीमध्ये म्हणाले, आप पान खाते है क्या? या गुटखा?असा प्रश्न केला. त्यावर त्या अधिकाऱ्याने मला कुठलेही व्यसन नाही. माझ्या दातांचा रंगच तसा आहे. असं सांगितलं.
नंतर अजित पवार म्हणाले, तुमच्याच दातांचा रंग कसा काय वेगळा? अजित पवार हसत हसत म्हणाले ‘हमें बेवकूफ समझते हो क्या आप? असं म्हणत स्वत:च हसायला लागले व उपस्थितामध्ये हशा पिकला. यामुळे याची चर्चा झाली. अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावाने प्रसिद्ध आहेत.
त्यांच्या जे पोटात असतं तेच त्यांच्या ओठावर असतं, मनात काही न ठेवता ते बोलतात. नंतर अजित पवार म्हणाले, मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री आहे, तुमच्या बँकेसाठी काही मदत लागली तर सांगा, पण आमच्या बारामतीमधील स्थानिक मुला-मुलींना नोकरी द्या, अशा सूचना देखील दिल्या.