Solapur : बढती मिळालेल्या बड्या पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या, घटनेने उडाली खळबळ, नेमकं काय घडलं


Solapur सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात नांदेड येथील एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे. Solapur

आनंद प्रकाश मळाले (वय. ४७ वर्ष, रा.सम्राट अशोक हौसिंग सोसायटी, कुमठा नाका, सोलापूर) असे पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

आनंद मळाले हे नांदेड पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. एका पोलीस अधिकाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची बाब सदर बाजार पोलीस ठाण्याला कळताच सोलापूर पोलीस दलातील सर्वच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

एपी.आय मुनिर मुल्ला यांनी आनंद मळाले यांना पहाटेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. नांदेड पोलीस दलातील अधिकारी आनंद मळाले हे गेल्या अनेक दिवसांपासून रजेवर होते. पत्नी, एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाले हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले.

त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि सदर बाजार या ठिकाणी सेवा बजावली आहे. पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती.

शनिवारी पहाटे राहत्या घरी त्यांनी नैराश्यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडली. त्यांच्या पत्नीला गोळीचा आवाज आल्याने त्या बाहेर अंगणात धावत आल्या. पत्नीच्या डोळ्यासमोर आनंद मळाले रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पत्नीने जोरात आरडाओरड करत घरातील आणि इतर नातेवाईकांना, शेजाऱ्यांना बोलावून घेतले.

सदर बाजार पोलीस ठाण्याला ही घटना कळताच ताबडतोब पोलीस अधिकाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. एपी.आय मुनिर मुल्ला यांनी आनंद मळाले यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. सोलापूर पोलीस दलातील उपायुक्त विजय कबाडे, एसी.पी राजू मोरे, पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर आदी घटनास्थळी दाखल झाले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!