सोलापूर हादरलं!! दोन महिन्यांपूर्वी प्रेम विवाह, आता दोघांनीही एकत्र आयुष्य संपवलं, घटनेने सगळे हादरले…


सोलापूर : सोलापूर शहराजवळ असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील उळे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या नव दाम्पत्याने टोकाच पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

सध्या सोलापुरात याच घटनेची चर्चा सुरू आहे. एकाच खोलीत या नवं जोडप्याचे मृतदेह आढळल्याने सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत. दोन महिन्यांअगोदर प्रेम विवाह केलेल्या गोपाळ आणि गायत्रीने जीव का दिला हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

याबाबत माहिती अशी की, गोपाळ गुंड याने आपल्या पत्नीचा वायरने गळा दाबून खून केला आणि त्यानंतर त्यांनी स्वतः गळफास घेत आयुष्य संपवलं असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.

मध्यरात्रीया सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीस कुटूंबाकडून आणि जवळच्या व्यक्तींकडून तपास करत आहेत. सिव्हिल पोलीस चौकीत सदर घटनेची नोंद झाली आहे.

सकाळी गायत्रीचा मृतदेह खाली फरशीवर पडला होता. तसेच गोपाळ गुंड हा तीस वर्षीय तरुण नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. याबाबत सकाळी इतरांना माहिती मिळाली. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केला होता. प्रेमविवाह केलेल्या या दोघा नव दाम्पत्याने टोकाचा पाऊल का उचलले? याबाबत तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!