Solapur : काँग्रेस उमेदवाराचा पराभव होण्याचे मुख्य कारण असलेल्या वंचीतच्या उमेदवाराची सोलापूरमधून माघार आता होणार थेट लढत…


Solapur : सोलापूरमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे नेमकं काय कारण आहे. याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

यबाबतची घोषणा ते लवकरच करणार असून, आपली भूमिका ते माध्यमांसमोर मांडणार आहेत. गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे आता याठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात सरळ लढत होणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अक्कलकोटचे राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली होती. यामुळे याचा फटका कॉंग्रेस उमेदवाराला बसेल हे नक्की होतं.

गायकवाड यांची उमेदवारी सोलापूरसाठीही नवखी होती. त्यावेळी त्यांच्या उमेदवारीची चर्चा झाली होती. राहुल गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. Solapur

याबाबतची घोषणा ते लवकरच करणार आहेत. पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका मांडणार आहेत. वंचितच्या गायकवाड यांच्याबरोबरच काही अपक्ष उमेदवारांनीही माघार घेतली आहे. यामुळे याचा फायदा प्रणिती शिंदे यांना होण्याची शक्यता आहे.

राहुल गायकवाड यांच्या माघारीमुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात आता काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांच्यात थेट लढत होणार आहे. वंचितने उमेदवार मागे घेण्यापूर्वीच एमआयएमने सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे सोलापुरात प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात लढत होणार हे आता निश्चित झाले आहे. यातच मोहिते देखील राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडे आल्यामुळे आता याठिकाणी काँग्रेसची ताकद वाढली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!