Solapur : हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे आणि टी. राजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल..

Solapur : हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजप आमदार टी.राजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही नेत्यांनी भाषण्यादरम्यान धार्मिक तेढ वाढवणारी वक्तव्ये केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, चितावणीखोर वक्तव्य दोन्ही नेत्यांनाच चांगलीच भोवली आहेत. या प्रकरणी सोलापुरातील जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा, यसह हिंदुत्वाच्या इतर मुद्यांसाठी सकल हिंदू समाज नावाच्या संघटनेच्यावतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाळीवेस, टिळक चौक, कन्ना चौक मार्गे कन्ना चौकात हा मोर्चा पोहोचल्यानंतर तेथे झालेल्या सभेत आमदार नितेश राणे व आमदार टी. राजा यांनी दोन जाती-धर्मामध्ये विद्वेष फैलावणारी आणि दुसऱ्या धर्मियांच्या विरोधात चिथावणी देणारी भाषणे केली. Solapur
मात्र हा मोर्चा मधला मारुती परिसरात मोर्चा आल्यानंतर काही दुकानांची अज्ञात लोकांनी तोडफोड केली. तर काही जण दगडफेकीमुळे जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थवरून सतीश शिंदे आणि शेखर स्वामी या दोघांना ताब्यात घेतलेलं होतं. रात्री उशिरा या दोघाना अटक करून अन्य १२ ते १५ अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वीही कथित धर्मांतर, लव्ह जिहाद आदी मुद्यांवर सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला असता रस्त्यावर दगडफेकीचा प्रकार घडला होता. वादग्रस्त विधाने करण्यात आमदार टी. राजा आणि आमदार नितेश राणे हे आघाडीवर असतात.
दरम्यान ही पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली होती. पोलिसांनी सभेला परवानगी देताना आमदार राणे व आमदार राजा या दोघांसह आयोजकांना परवानगीतील अटी व शर्तींचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बजावले होते.