Solapur Accident : पंढरपूर- कराड महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने ५ महिलांना चिरडले..


Solapur Accident : राज्यात अलीकडे अपघाताच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक सोलापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. यामध्ये पाच महिलांचा मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. हा अपघात सांगोला तालुक्यातील पंढरपूर-कराड रस्त्यावर झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाचही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. दोन्ही गंभीर जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस अपघाताचा तपास करण्यात व्यस्त आहेत.

दरम्यान, सर्व महिला सांगोला तालुक्यातील काटफळ येथील रहिवासी आहेत. चिकमहुड गावात शेतातील कामे आटोपून घरी जाण्यासाठी महिला पंढरपूर-कराड रोडवर वाहनाची वाट पाहत उभ्या होत्या. Solapur Accident

त्याचवेळी कोळसा घेऊन जाणारा ट्रक तिथून जात होता. अचानक ट्रक चालकाचा तोल गेला आणि तो महिलांच्या अंगावर धावून गेला. या अपघातात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक जमा झाले आणि त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. लोकांनी पोलिसांनाही अपघाताची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि दोन्ही गंभीर जखमी महिलांना रुग्णालयात दाखल केले. पाच महिलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!