स्त्री ही कुटूंबाची आधारवड ,’स्त्री’चा समाजव्यवस्थेत सन्मान हवाच – ज्येष्ठ समाजसेविका सुषमा करंदीकर यांचे मत…!
उरुळी कांचन :’स्त्री’ ही कुटूंब व्यवस्थेत आधारवड आहे, ‘स्त्री’ चा योग्य सन्मान ही समाजव्यवस्थेची जबाबदारी आहे. ‘स्त्री’ ही आजारी वृद्ध सासू-सासरे, आई-वडील यांची सेवा मनोभावे करीत असते. मात्र तिच्या भावना घरातील व्यक्तींनी जाणून घेऊन तिच्या कामाचे कौतुक केले पाहिजे, असे मत जेष्ठ समाजसेविका सुषमा करंदीकर यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मिडीयम स्कूल येथे कस्तुरबा मातृ मंडळ आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त “तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना” या विषयावर व्याख्यान शनिवारी (दि. ०४) आयोजित करण्यात आले होते. यावेळी समाजसेविका सुषमा करंदीकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पा मधुकर पदवाड होत्या.
माजी सरपंच ज्ञानोबा कांचन, महाराष्ट्र राज्य कॉग्रेस कार्यकारणी सदस्य देविदास भन्साळी, हवेलीचे जेष्ठ नेते प्रा. के. डी. कांचन, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सचिव सोपान कांचन, कोंडिराम चौधरी, एकनाथ चौधरी, जयप्रकाश बेदरे, सुरेश सातव, उपसरपंच अनिता तुपे, सुशिला मेटे, संगिता भालके, राजश्री शितोळे, जयश्री बेदरे, छाया नहार, प्रिया बलदोटा, रश्मी कुलकर्णी, मिनल फुलफगर, स्वाती चौधरी, आशा कांचन, सायरस पूनावाला शाळेच्या प्राचार्या राजीकुमारी लक्ष्मी, आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
करंदीकर म्हणाल्या, “बायका नेहमी एक तक्रार करतात ती म्हणजे, मी घरासाठी मर मर मरते, पण कुणाला त्याची किंमत नाही. यातून त्या दुःखीकष्टी होतात, आपली किंमत कवडीमोल, आपल्याला कोणी समजून घेत नाही, मी म्हणजे घरकामासाठी मोलकरीण वगैरे अशा तक्रारी करतात इथे मात्र महिलांनी आता दृष्टिकोनच बदलला पाहिजे.”
दरम्यान, या कार्यक्रमाचे आयोजन कस्तुरबा मातृमंडळाच्या अध्यक्षा सुरेखा भन्साळी यांनी केले होते . कस्तुरबा मातृमंडळाच्या वतीने महिलांसाठी कालची स्त्री, आजची स्त्री, व उद्याची स्त्री या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रथम पारितोषिक सुरेखा मोरे यांनी पटकाविले, द्वितीय प्रिया गुगळे, तुतीय पारितोषिक विद्या मेटे यांनी पटकाविले. सदरचे बक्षीस प्रतिभा कांचन, दीप्ती शहा यांच्या उत्तेजनार्थ देण्यात आले. तर साळुंखे बाई, पंडित बाई, ढवळे सर, व काशीद सर यांनी परीक्षण केले.