….म्हणून सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी दिली! मोहिनी वाघ यांचा आता मोठा खुलासा

पुणे : पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच सुपारी दिली होती. पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. पुण्यातील मांजरी परिससरात ९ डिसेंबरला पहाटे साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली.
सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेतला. पोलिसांनी तपास केल्यानंतर सतीश वाघ यांच्या हत्येला पत्नी मोहिनी वाघ यांच्या अनैतिक संबंधाची किनार असल्याचे स्पष्ट झाले. आता मोहिनी वाघने तिच्या पतीच्या अनैतिक संबंधांमुळे आणि तिच्यावर होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळामुळे खुनाचा कट रचल्याचे पोलिस चौकशीत कबूल केले आहे.
हल्लेखोरांनी सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर त्यांच्या अंगावर जवळपास ७२ वार करण्यात केले. सतीश वाघ हे दारू पिऊन मोहिनी वाघ यांना सतत त्रास देत होते तसेच प्रेमसंबंधात आड येत होते, त्यामुळे मोहिनी यांनी ५ लाखांच्या हत्येची सुपारी हल्लेखारांना दिली, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली होती.
सतीश वाघ याचे अपहरण केल्यानंतर वाघ यांच्या अंगावर 72 चाकूचे वार केले. मारेकरी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सतीश वाघ यांचे गुप्तांग देखील कापले. घटनेनंतर ज्यावेळी पोलीस मोहिनी वाघ यांच्या घरी चौकशीसाठी गेले, त्यावेळी पतीच्या जाण्याने आपल्याला दु:ख झाल्याचे नाटक करून पतीसोबत किती छान जमायचे, त्याचे काही प्रसंग मोहिनी यांनी कथन केले.
यादरम्यान दर काही मिनिटांनी ती मोठ्याने रडायची. आपल्या रडण्याने आणि आक्रोशाने पोलिसांना आपल्यावर संशय येणार नाही, असे मोहिनीला वाटले. मात्र मोहिनीच्या जवळच्या व्यक्तीनींच पोलिसांना अक्षय जवाळकर याच्याशी तिचे गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे सांगितले.