आता पर्यंत १३ कोटी लोकांचे पवित्र स्नान, महाकुंभकडे लोकांची गर्दी वाढली, प्रशासनाकडून जय्यत नियोजन…

Maha Kumbh 2025 : जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा अशी ओळख असलेला कुंभ मेळा सोमवारी (ता.१३ जानेवारी) प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर सुरू झाला आहे. या संगमावर तंबूंचे एक पूर्ण शहरच वसले आहे.
रोज येणाऱ्या भाविकांचा ओघ अखंड सुरू आहे. आज ४६.६४ लाखाहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले आहे. तर २६ जानेवारी २०२५ पर्यंत १३.२१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र नद्यांच्या संगमामध्ये श्रद्धेची डुबकी लावत स्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे.
तसेच उत्तर प्रदेश सरकारकडून येणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण केल्या असून, अनेक स्वयंसेवी संस्थांनीही भाविकांच्या सोयींसाठी अनेक लंगर, प्रसादालय, पाणी, वैद्यकीय सुविधा, पार्किंग, राहण्यासाठीची व्यवस्था यासारख्या असंख्य सुविधांची निर्मिती केली आहे. तसेच जगभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सोई सुविधांमुळे भक्तांमधून समाधान…
प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सोई सुविधांमुळे भक्तांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांना सुरक्षीत स्नानासाठी नद्यांच्या काठावर घाट बांधण्यात आले आहेत. तसेच गोताखोर आणि लोकांच्या मदतीसाठी पोलिस प्रशासनही तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, विविध आखाड्यातील साधू-संत राजेशाही थाटात महाकुंभात दाखल होत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो भाविक हत्ती, घोडे, उंट घेऊन नाचत-गाणी म्हणत सहभागी झाले आहेत.