मोठी बातमी! स्मृती मानधनाच्या वडिलांना लग्नाच्या दिवशीच हृदयविकाराचा झटका, विवाह सोहळा पुढे ढकलला…


सांगली : सांगलीमध्ये आज भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाचा विवाह सोहळा होणार होता. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. हळद, संगीत नाईट असे वेगवेगळे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आले. असे असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

स्मृती मानधनाच्या वडिलांना लग्नाच्या काही तास अगोदर हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. आज स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. परंतु या लग्नाआधीच मोठे अघटित घडले आहे.

त्यानंतर वडिलांची प्रकृती लक्षात घेता स्मृती मानधना हिने आपले लग्न पुढे ढकलले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. लग्नाच्या मुहूर्ताच्या अवघ्या काही तास अगोदर ही घटना घडली आहे. श्रीनवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

       

यावेळी सर्व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. याबाबत अजून पुढील माहिती मिळाली नाही. त्यांच्यावर डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र लग्नाची तयारी थांबवण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, लग्न पुढे ढकलले आहे. वडिलांची प्रकृती चांगली झाल्यानंतरच पुन्हा विवाह सोहळा पार पाडण्यात येईल. असा निर्णय तिने घेतला आहे. त्यामुळेच सर्व पाहुण्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत अनेकांनी आज सांगलीत उपस्थिती लावली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!