राहुल गांधींवर स्मृती ईराणी यांनी केले गंभीर आरोप, म्हणाल्या, मला फ्लाईंग किस…
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधींवर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी गंभीर आरोप केले आहेत. सभागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी फ्लाईंग किस दिल्याचा गंभीर आरोप मंत्री स्मृती ईराणी यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
त्यांची ही कृती चुकीची आहे, असे सांगत भाजपच्या 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेतली. राहुल गांधी यांनी महिलांचा अपमान केला असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिल्याचा क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा आरोप झाल्याने आता अनेकांच्या नजरा सीसीटीव्हीकडे लागल्या आहेत.
राहुल गांधींची कृती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असावी, त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक करण्यात यावे, अशी मागणी आता भाजपकडून जोर धरू लागली आहे. यामुळे आता काय होणार हे लवकरच समजेल.
दरम्यान, नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलत असताना त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.