Slap PM : मोठी बातमी! गळ्यात हार टाकायला आला अन् थेट माजी पंतप्रधानांना कानशिलात लावली, नेमकं काय घडलं?

Slap PM : नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना गुरुवारी एका व्यक्तीने कानशिलात मारली. निवडणूक प्रचारादरम्यान जेव्हा कार्यकर्ते विरोधी पक्षनेते केपी शर्मा ओली यांना पुष्पहार अर्पण करत होते तेव्हा एका व्यक्तीने माजी पंतप्रधानांच्या थेट कानाखाली लगावली. त्यांचा चापट मारल्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
प्रचारादरम्यान जेव्हा कार्यकर्ते विरोधी पक्षनेते केपी शर्मा ओली यांना पुष्पहार देत होते, तेव्हा एका व्यक्तीनेही त्यांचे स्वागत केले. माजी पंतप्रधानां जेव्हा पुष्पहार गळ्यात घालण्यासाठी मान खाली करतात, त्यावेळी तो व्यक्तीने त्यांना चापट मारली. दरम्यान चापट मारून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा अधिकाऱ्यांनी पकडले. Slap PM
नेपाळमधील हा संपूर्ण प्रकार आहे. नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली हे निवडणूक प्रचारासाठी एका मतदारसंघात गेले होते. तेव्हा एक व्यक्ती हार घालण्याच्या बहाण्याने पुढे आला, त्याने त्यांचं स्वागत केले आणि त्यांना लगेचच चापट देखील मारली. तो चापट मारून पळून जाण्याच्या प्रयत्न करत होता, मात्र त्याला सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
या व्यक्तीने केपी शर्मा ओली यांच्यावर हल्ला का केला? त्याचा उद्देश काय होता ? याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी सध्या या हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात आहे. खरंतर ओली त्यांच्या भारतविरोधी वक्तव्यांसाठी ओळखले जातात.