हृदय पिळवटून टाकणारी घटना! प्रेमासाठी सहा वर्षाच्या चिमुरड्याची आईकडूनच हत्या; खेडमध्ये खळबळ…

पुणे : प्रेमात अडथळा ठरू शकतो म्हणून पोटच्या ६ वर्षांच्या मुलाचा आईने जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराच्या मदतीने हे कृत्य केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या खेडमध्ये घडली आहे.

पुरावे मिटवण्यासाठी आई मृतदेह माहेरी घेऊन गेली. मृत्यू हृदय विकाराच्या धक्क्याने झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र मुलाच्या आजोबांना संशय आला, त्यांनी परळी पोलिसांकडे तक्रार केली. मग शवविच्छेदन अहवालात आईचं बिंग फुटलं.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खेड तालुक्यातील कुरुळी येथे ही घटना घडली. 27 वर्षीय आई बसरिन मेहबूब शेख हिचे आरोपी राम विनायक कजेवाड याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात तिचा 6 वर्षांचा मुलगा आवेज मेहबूब शेख हा अडथळा ठरत होता.

म्हणून 4 एप्रिलच्या रात्री साडे अकराच्या सुमारास आईने प्रियकराच्या मदतीने आवेजचा जीव घेतला. बाथरुममधील पाण्याच्या बादलीत डोके बुडवून नंतर डोके भिंतीवर आणि जमिनीवर आपटून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

दरम्यान, आईला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात मात्र तिचा प्रियकर फरार झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. प्रेमासाठी पोटच्या मुलाचा जीव कसा घेऊ शकते असा संतप्त सवाल नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!