मे महिना पण पावसातच जाणार, अनेक भागात अधूनमधून पावसाची शक्यता
पुणे : मे महिन्यात उत्तर भारतासह देशाच्या अनेक भागात अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात 15 मे पर्यंत तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. यामुळे कडक उन्हाळ्याच्या दिवसात देखील पाऊस पडणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
मे महिन्यात पूर्व आणि दक्षिण भारताला उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागेल, तर उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमान तुलनेने कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील 10 दिवसांमध्ये, उत्तर आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात विखुरलेल्या गडगडाटी वादळांची उपस्थिती राहील.
वायव्य आणि पश्चिम-मध्य भारतात तापमान सामान्य आणि सामान्यपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे. याशिवाय पूर्व आणि पूर्व मध्य भागात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप राहील. मे महिन्यात देशात 91 ते 109 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यामुळे जून महिन्यापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाळाच सुरू होत आहे. यंदा किती पाऊस पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.