बहिणींची ‘लाडकी बहीण योजनेकडे ‘पाठ; एकही नवा अर्ज नाही; पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी


पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोलाचा वाटा ठरलेल्या लाडकी बहीण योजनेकडे आता बहिणीनीं पाठ फिरवली आहे.या योजनेंतर्गत गेल्या पाच महिन्यांत एकही नवा अर्ज प्राप्त झालेला नाही. त्याच वेळी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे

राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडे लाडकी बहीण योजनेची सद्यस्थिती काय, किती जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, अशी विचारणा करणारा अर्ज माहितीच्या अधिकारांतर्गत दाखल करण्यात आला होता. त्यास उत्तर देताना विभागाचे कक्ष अधिकारी संतोष दळवी यांनी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी असल्याची माहिती दिली. गेल्या पाच महिन्यांत एकही नवा अर्ज प्राप्त झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान एकही नवा अर्ज आला नसल्याने हळूहळू या योजनेची व्याप्ती कमी करण्याचा सरकारचा विचार असावा, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

योजनेची सद्यस्थिती
पात्र महिला- १,५९,५६,९६७
पाच महिन्यांत दाखल झालेले अर्ज- शून्य
सर्वाधिक पात्र लाभार्थी- पुणे जिल्हा
लाभार्थ्यांमध्ये ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्या महिलांची संख्या अधिक

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!