मित्रासोबत लॉजवर गेलेल्या बहिणीला भावाने रंगेहाथ पकडलं, घाबरून मुलीने लॉजवरूनच टाकली उडी, धक्कादायक घटनेने सगळेच हादरले…


नांदेड : अर्धापूर तालुक्यातील एका गावात तीन तरुणी महाविद्यालयाच्या  तृतीय वर्षात शिकतात. कॉलेज सुटल्यानंतर दुपारी ह्या तीन तरुणी आप-आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरुन तामसा रोड येथील हॉटेल गारवा लॉजवर गेल्या. यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला.

यामध्ये एका तरुणीच्या भावाला याची माहिती झाल्याने भावाने बहिणीला लॉजवर रंगेहाथ पकडले. भावाने बहिणीला आणि तरुणाला एका खोलीत रंगेहाथ पकडले. यामुळे ही तरुणी खूपच घाबरली. यावेळी मोठा वाद निर्माण झाला. यामुळे तरुणीने लॉजवरून उडी मारून पळ काढला, यात तिचा एक हाथ मोडला.

तरुणीचा भाऊ आणि अन्य दोघांनी तरुणाला लॉजमधून बाहेर आणले. त्यानंतर, भोकर फाट्याजवळ आणून त्याला मारहाण करुन पोटात खंजर मारला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. तसेच जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने सगळेच हादरले आहेत.

या घटनेने कॉलेजमधील तरुणाईंमध्ये चाललंय काय, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. घटनेनंतर तीन तरुणांनी आम्हा तिघींना बळजबरी दुचाकीवर बसवून लॉजवर नेले आणि त्यात अत्याचार केल्याची तक्रार पीडित तरुणीने दिली आहे.

याबाबत तिघांवर अत्याचार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. तसेच मारहाण झाल्यामुळे देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सध्या पोलीस तपास करत असून तिन्ही मुली अशा बळजबरीने घेऊन कशा गेल्या याबाबत तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!