फेरफार नोंद मंजूर करण्याचा घाट, १० लाखांची लाच, अडीच लाख स्वीकारताना सिन्नरच्या नायब तहसीलदारास अटक..


पुणे : फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी १० लाखांची लाच मागून तडजोडीअंती अडीच लाखांची स्वीकारताना सिन्नरच्या नायब तहसीलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकच्या पथकाने बुधवारी (ता.१०) अटक केली आहे.

पथकाने नायब तहसीलदारास नाशिक शहरातील सोपान हॉस्पिटलसमोर लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरातील सोपान हॉस्पिटलसमोर असलेल्या रोडच्याकडेला बुधवारी (ता.१०) केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

सजय भिकाजी धनगर (वय ५१, रा. के. पी. मार्केट समोर, नाशिक) असे अटक केलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, सजय धनगर हे महसूल विभागात सिन्नर वर्ग २ चे अधिकारी आहेत. तक्रारदारांनी त्यांचा मुलगा व सुनेच्या नावे दोडी खुर्द (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील गट क्र. ४९९ क्षेत्र ३ हे ६० आर शेतजमीन खरेदी केली होती. सदर खरेदी खतावरून दोडी खुर्द येथील तलाठ्याने घेतलेल्या फेरफार नोंद क्र.३३४५ रद्द करण्यासाठी तक्रार दिली आहे.

या तक्रारीचा निकाल तक्रारदारांच्या मुलगा व सुनेच्या बाजून लावून सुनावणीसाठी असलेला फेरफार नोंद क्र. ३३४५ मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात नायब तहसीलदार संजय धनगर यांनी ६ डिसेंबर रोजी तक्रारदाराकडे १० लाख रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती २ लाख ५० हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले.

याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने मंगळवारी (ता.९) शहानिशा करून सापळा रचला. नाशिक शहरातील सोपान हॉस्पिटलसमोर रोडच्याकडेला तक्रारदाराकडून २ लाख ५० हजारांची लाच घेताना नायब तहसीलदार संजय धनगर यांना पथकाने अटक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!