मावळमधील सख्या बहिण-भावाने करून दाखवलं! एकाचवेळी पोलीस दलात निवड, सर्वत्र होतंय कौतूक


मावळ : मनात जिद्द असेल तर कोणीही काहीही करेल याचे उदाहरण मावळमध्ये घडले आहे. येथील साते गावातील सानिका मारुती काजळे आणि अभिषेक मारुती काजळे या सख्ख्या बहीण-भाऊंनी पोलिस भरतीमध्ये बाजी मारली आहे. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

दरम्यान, आपली दोन्ही मुले पोलिस झाल्याने स्वप्न साकार झालेल्या आईच्या आनंदाला पारावर उरला नाही. यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. काजळे कुटुंबातील अभिषेक आणि सानिका यांच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य आहे.

आई गावातील एका पोल्ट्री कंपनीमध्ये काम करत आहे. वडील मारुती काजळे यांचे सानिका लहान असतानाच निधन झाले. काजळे कुटुंब मूळचे चिखलसे गावचे, पण लहानपणापासून साते गावात मामाकडे राहायला आहे.

अभिषेकने नवनीत करियर अकादमी कामशेत येथे तर सानिकाने शौर्य अकादमी वडगाव येथे पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेतले. अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न या पंचसूत्रीच्या जोरावर या दोघांनी यश संपादन केले आहे

तसेच, त्याच गावातील ओमकार भाऊ भुंडे या युवकानेही पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केल्याने तिघांचे सर्वत्र कौतूक होत आहे. त्यांची सध्या तालुक्यात चर्चा सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!