चांदीची झळाळी उतरणार ; किती टक्क्यांनी भाव कोसळणार? सोन्याचा दर किती?


पुणे : गेल्या काही काळापासून चांदीच्या किमतीत झालेल्या अफाट वाढीमुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. मात्र आता लवकरच त्याच्या किमती जमिनीवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2025 मध्ये तब्बल 180 टक्के नफा देणारी चांदी आता 60 टक्क्यापर्यंत जमिनीवर कोसळणार आहे.

चांदीच्या किमती सर्वोच्च शिखरावर पोहोचल्या असताना आता यात मोठी घसरण होणार आहे. आर्थिक वर्ष 2026-27 च्या अखेरीस जागतिक बाजारात चांदीचे भाव 40 डॉलर किंवा अगदी 35 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली येऊ शकतात. म्हणजेच सध्याच्या उच्चांकावरून चांदी 60 टक्क्यांपर्यंत स्वस्त होऊ शकते.

सध्याची भाववाढ ही तात्पुरती असू शकते. रिटेल गुंतवणूकदारांनी आता नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी. कोणताही कच्चा माल उद्योगाला नियंत्रित करू शकत नाही, तर उद्योगच कच्च्या मालाची किंमत ठरवतात. त्यामुळे जर तुम्ही चांदीत मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा संभाव्य धोका लक्षात घेणे आवश्यक आहे.

तर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दारात 300 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे.यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 13,62,000 रुपयांवरुन 13,58,200 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 380 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 1,36,200 रुपयांवरुन 1,35,820 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!