चांदीच्या दरात आज अचानक मोठी वाढ!! तब्बल 3483 रुपये प्रतिकिलोने झाली वाढ! सोन्याची काय स्थिती? जाणून घ्या…


मुंबई : सध्या सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. यामुळे खरेदीदारांचे याकडे लक्ष लागले आहे. आज चांदीचे दर प्रति किलो सर्वाच्च पातळीवर पोहोचले आहेत. आज 14 जुलै रोजी एक किलो चांदीची किंमत तब्बल 3483 रुपयांनी वाढून एक लाख 13 हजार 773 रुपये झाली आहे

दोन दिवसांपूर्वी चांदी एक लाख दहा हजार 290 रुपये प्रति किलो होती. ती आतापर्यंतचे सर्वोच्च किंमत होती. तसेच आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत देखील वाढ झाली. सोन्याच्या दरात देखील 586 रुपयांनी वाढ झाली. यामुळे यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्राम 97 हजार 511 रुपये होता. तसेच 18 जून रोजी सोन्याने 99454 रुपयांचा उच्चांक गाठला होता. यामध्ये हे दर लाखाच्या आसपास असल्याचे दिसून येत आहे. आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 880 रुपये असून 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 550 रुपये आहे.

तसेच कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 9980 रुपये असून 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 91 हजार 550 रुपये इतके आहे. चेन्नई येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 9980 रुपये आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 550 रुपये आहे. यामुळे काही शहरात हे दर वाढत बदलत आहेत.

तसेच राजधानी दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख तीस हजार रुपये असून 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 700 रुपये इतकी आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या शहरातील बाजातील चढ उतारावर इतर ठिकाणांचे दर अवलंबून आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!