चांदीने रेकॉर्ड मोडला ; 1 किलो चांदीचा भाव लाखाच्या घरात,सोन्यातही मोठी वाढ, आता भाव काय?

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोने- चांदीच्या दरात 2025 मध्ये जोरदार वाढ झाली आहे.आता चांदीने रेकॉर्डचा तोडला असून एक किलो चांदीचा भाव अडीच लाखांच्या घरात पोहचला आहे. तर सुवर्णपेठेत सोन्याने पण नवीन विक्रम केला आहे.

सराफा बाजारात चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली. चांदीच्या दराने अडीच लाखांचा आकडा ओलांडला. चांदीच्या दरात तब्बल 20 हजार रुपयांची वाढ झाली.चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 57 हजार 500 रुपयांवर पोहचले. त्यामुळे अनेक जण चांदी खरेदी करण्यासाठी नाही तर घरातील जुनी चांदी मोडण्यासाठी आणि चांदीची भांडी मोड देण्यासाठी पसंती देत आहेत.

तर सोन्याच्या दरात 1 हजार 600 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. जळगावच्या सराफा बाजारात सोने सुद्धा भाव खाऊन गेले. सोने जीएसटीसह 1 लाख 43 हजार 376 रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे सोने नवीन वर्षात दीड लाखांच्या घरात पोहचणार अशी चर्चा सुरू आहे. लवकरच सोन्याच्या दरवाढीचे चित्रही समोर येईल.

दरम्यान येत्या 2026 च्या वर्षात सोन्या आणि चांदीच्या दरात आणखीन वाढ होणार आहे. चांदीचे दर 2.30 ते 2.50 लाख रुपये पर्यंत पोहचू शकतात.
