Sikkim Rain News : सिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार! ढगफुटीमुळे मोठा पूर, 23 जवान बेपत्ता..


Sikkim Rain News सिक्कीमध्ये बुधवारी प्रकोप पाहायला मिळाला त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. सिक्कीममधील ल्होनाक तलावावर अचानक ढग फुटल्याने तीस्ता नदीला पूर आला. यामध्ये लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाल्याची माहिती आहे.

प्रशासनाने आसपासच्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. शोध मोहीम सुरू आहे. रात्रीच्या अंधारात ढगफुटी झाली आणि सकाळच्या उजेडात सगळीकडे निसर्गाने केलेल्या प्रकोपाच्या खुणा दिसत होत्या. Sikkim Rain News

मिळालेल्या माहितीनुासर ल्होनक तलावावर रात्रीच्या सुमारास ढगफुटी झाली. यानंत लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीच्या पातळीत अचानक वाढ झाली. नदीच्या पाण्याची पातळी अचानक १५ ते २० फुटांनी वाढली. यानंतर नदीच्या जवळपास परिसरात पाणी भरू लागले. अनेक घरांमध्ये पाणी भरले.

तसेच पहाटे २३ सैनिक बेपत्ता झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर आता २३ जवानांसह एकूण ३० जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.गुवाहाटीतील संरक्षण पीआरओने सकाळी सांगितले होते की, ‘सिक्कीमच्या उत्तरेकडील ल्होनाक तलावाला अचानक पूर आला. २३ जवान बेपत्ता आहेत.

चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने डाउनस्ट्रीमच्या पाण्याची पातळी अचानक १५-२० फुटांपर्यंत वाढली. त्यामुळे सिंगतामजवळील बारडांग येथे उभ्या असलेल्या लष्कराच्या वाहनांची कोंडी झाली. लष्कराचे २३ जवान बेपत्ता तर ४१ वाहने चिखलात बुडाल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!