मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या की शिवकुमार? कर्नाटकमध्ये काँग्रेसमध्ये चुरस


कर्नाटक : काल कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोठा विजय मिळवला. भाजपचे राज्यात पानिपत झाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतरआता पक्ष मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यापैकी कोणाची निवड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, डीके शिवकुमार यांचे भाऊ आणि काँग्रेस खासदार सुरेश यांनी आपल्या भावाला मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे चर्चा रंगू लागली आहे.

डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवल्यास खूप आनंद होईल, असे ते म्हणाले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाने आज संध्याकाळी साडेपाच वाजता बेंगळुरूमध्ये आमदारांची बैठक आयोजित केली आहे.

ज्यामध्ये सर्व आमदार राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांसाठी मतदान करतील. यामुळे आता कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय स्थरावरील देखील नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!