Shrikant Shinde : गुन्हेगारांना राजकीय नेत्यांच्या पाठिंबा? आता शरद मोहोळच्या साथीदाराने घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट, उडाली खळबळ..
Shrikant Shinde : उल्हासनगरमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे एकच चर्चा सुरु झाली आहे.
विशेष बाब म्हणजे हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या गुन्ह्यात साथीदार असून खासदार संजय राऊत यांनी हा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे.
काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या, मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? असं ट्वीट खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. यासोबतच त्यांनी सरकारवर देखील निशाणा साधला आहे.
मा. गृहमंत्री देवेन्द्रजी
जय महाराष्ट्र!
महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे.पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात!
गुंडांचे इतके बळ का वाढले?
या परिस्थितीस जबाबदार कोण?
काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील… pic.twitter.com/jnmgurI5gm— Sanjay Raut (@rautsanjay61) February 5, 2024
“मा. गृहमंत्री देवेन्द्रजी, जय महाराष्ट्र! महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात. गुंडांचे इतके बळ का वाढले आहे? या परिस्थितीस जबाबदार कोण आहे? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला.
बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते समजेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत!’, अशी आशयाची पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या भेटीवरून टीका होत असतानाच आता कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. Shrikant Shinde
खासदार श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या गुन्ह्यात साथीदार आहे. गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहळ सोबत हेमंत दाभेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
दरम्यान, हेमंत दाभेकर हा जामिनावर बाहेर असून, शरद मोहोळ याचा अत्यंत जवळचा व्यक्ती मानला जातो. यातच दाभेकरने थेट वर्षा बंगल्यावर जाऊन खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.