महाराष्ट्रात आता श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना!! मुलगी जन्माला आली की मिळणार दहा हजार रुपये…

मुंबई : श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ लवकरच राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांमुळे मुलींच्या शिक्षणाला आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. या योजनेला न्यास व्यवस्थापन समितीने मंजुरी दिली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, असा आहे.
तसेच मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे आणि स्त्री सक्षमीकरणाला चालना देणे याकडे सध्या लक्ष देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या बालिकांच्या नावाने 10,000 चे फिक्स डिपॉझिट त्यांच्या मातेच्या खात्यावर ठेवण्यात येणार आहे. यामध्ये अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेसाठी आवश्यक निकष जाहीर केले जातील, असेही सांगितले गेले आहे. यामुळे ही एक फायदेशीर योजना आहे. ही योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून, समाजात मुलींच्या जन्माविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, असा याचा उद्देश आहे.
यामुळे मुलींच्या शिक्षणाला चालना देणे आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल बनविणे हा या योजनेचा खरा हेतू आहे. महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये जन्मणाऱ्या नवजात मुलींना आर्थिक आधार देण्याची ही योजना अनेक कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरेल. यामुळे योजनेचा चांगला फायदा होईल. सध्या मुलींच्या जन्मास प्रोत्साहन आणि शिक्षणासाठी मदत यासाठी महाराष्ट्र सरकार आधीच विविध योजना राबवत आहे.
यामध्ये गरीब व गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय सहाय्य, गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तके उपलब्ध करून देणारी ‘पुस्तक पेढी योजना’, तसेच डायलेसिस सेंटरद्वारे रुग्णांना मदत हे काही महत्त्वाचे उपक्रम आहेत. मंदिर न्यासाने समाजाच्या हितासाठी केलेले हे कार्य प्रशंसनीय आहे. असेही सांगितले जात आहे.
दरम्यान, ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ अंतर्गत पहिल्या मुलीच्या जन्मानंतर पालकांना 50,000 अनुदान दिले जाते. तसेच, ‘लेक लाडकी योजना’ अंतर्गत मुलीला वयाच्या 18 वर्षांपर्यंत 75,000 च्या आर्थिक मदतीचा लाभ दिला जातो. श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना या उपक्रमांना पूरक ठरेल, असेही सांगितले जात आहे.