उरुळी कांचनमध्ये महाराजा प्रतिष्ठान व मित्र परिवारातर्फ़े श्रीराम जयंतीनिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा
उरुळी कांचन : सध्या प्रभू श्रीराम यांच्या जयंतीनिमित्त देशात वेगवेगळे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. उरुळी कांचनमध्ये महाराजा प्रतिष्ठान व मित्र परिवारातर्फ़े श्रीराम जयंतीनिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामुळे यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला आहे.
उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रणांगनामध्ये उरुळी कांचन शहर व आजुबाजूच्या परिसरातील स्पर्धकांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी ७५० स्पर्धक सहभागी झाले आहेत. महाराजा प्रतिष्ठानतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
यावेळी महाराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित भाऊ सतिश कांचन, भाजपा राज्य पदाधिकारी, सारिका लोणारी , जिल्हा कोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, क्षेत्रिय रेल्वे समिती सदस्य अजिंक्य कांचन, युवती उपाध्यक्ष पुजाताई सणस, झोपडपट्टी संघाचे अध्यक्ष आबासाहेब चव्हाण, हवेली तालुका उपाध्यक्ष खुशाल दादा कुंजीर, अक्षय कांचन उपस्थित होते.
तसेच सचिन कुंभार, सुनील तुपे, काजल खोमणे, मानसी भुजबळ, सचिन शेलार, गणेश घाडगे, विकी कांचन, प्रथमेश कांचन, आनंद बोरकर, सचिन बारबोले, अभिषेक दारवटकर, अमित तुपे, निलेश कदम, गणेश मेमाणे, गणेश कांबळे, केदार जाधव उपस्थित होते. या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.