Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा धक्का, रुग्णालयात उपचार सुरू…

Shreyas Talpade : मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आलीये. श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रेयसच्या प्रकृतीबाबतच्या या बातमीने सर्वांनाच धक्का बसला असल्याचे सांगण्यात येत आहे.

तो ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता आणि शूटिंग संपल्यानंतर त्याला अटॅक आला आणि तो बेशुद्ध झाला. त्याला मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू हॉस्पिटलमध्ये दाखल करून अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. Shreyas Talpade
शूट संपल्यानंतर तो घरी परतला आणि त्याने पत्नीला सांगितले की त्याला अस्वस्थ वाटत आहे. दवाखान्यात नेताच तो बेशुद्ध पडला. सध्या अँजिओप्लास्टीनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान,ग्णालयाने सध्या कोणतेही वैद्यकीय बुलेटिन जारी केलेले नाही. श्रेयस तळपदे या मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीला नावाजलेला अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.