श्री चिंतामणी यशवंत कारखानाच्या संचालक मंडळाचा उरुळीकांचन -सोरतापवाडी गटातील उमेदवारांना पाठिंबा; कारखान्याच्या हिताचे रक्षण करणाऱ्यांसोबत संचालक मंडळ राहणार – सुभाष जगताप

उरुळीकांचन : उरुळीकांचन -सोरतापवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र बाळासाहेब बडेकर , पंचायत समिती उमेदवार आण्णा महाडीक व सारीका कांबळे यांना श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाने पाठिंबा दिल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली आहे.

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप व संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत सर्व संचालक मंडळाने सर्वानुमते जितेंद्र बडेकर यांना पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या वाटचालीत कारखान्याला सहकार्य करणाऱ्या सर्व पक्षीय घटकातील उमेदवार यांंना पाठिंबा देण्याचा निर्णयाच्या भागातून उरुळीकांचन – सोरतापवाडी जिल्हा परिषद गटातून जितेंद्र बडेकर, पंचायत समिती उमेदवार आण्णा महाडीक व सारीका कांबळे यांंना पाठिंबा देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप म्हणाले, कारखान्याला उर्जितावस्थेत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. या कार्यवाहीचा भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रीमंडळ बैठकीत कारखान्याची जमीन विक्री प्रक्रियेला मान्यता दिली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. मात्र या कार्यवाहीला तात्पुरती स्थगिती मिळाली असली तरी लवकर या संदर्भात स्थगिती उठून सर्व प्रक्रिया सुरळीत होणार आहे.

कारखान्याला अर्थिक भागभांडवल उभा करण्यापासून ते शेतकरी व कामगार देणी भागविण्यासाठी जो घटक संस्थेसोबत असेल अशा सर्व घटकांना पाठिंबा देण्याचा निर्णयाला संचालक मंडळाचा पाठिंबा असणार आहे. संस्थेच्या हिताचे रक्षण करणे हाच संचालक मंडळाचा अजेंडा असून कारखाना सुरू करण्यास मुख्य उद्देश असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
या पाठिंब्यास माजी उपाध्यक्ष मोरेश्वर काळे, संचालक संतोष कांचन, शामराव कोतवाल, ताराचंद कोलते, अर्जुन थोरात, सागर काळभोर शशिकांत चौधरी आदी उपस्थित होते. दरम्यान अशा प्रकारे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अशा प्रकारे थेट पाठिंबा देणे फार दुर्मिळातील घटना घडली आहे.
