Shravan Somvar 2023 : शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने वैद्यनाथच्या दर्शनासाठी मोठी गर्दी, मंदिरात हर हर महादेवचा गजर…


Shravan Somvar 2023 बीड :  श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार (Shravan Somvar 2023) हा विशेष मानला जातो. या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि पूजा करतात. असे मानले जाते की, श्रावण सोमवार व्रत आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. (Shravan Somvar 2023)

तसेच देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाच्या नगरीत चौथा श्रावण सोमवारनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. शेवटच्या श्रावणी सोमवार असल्याने देशभरातील विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

रविवारपासूनच मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. हरहर महादेवचा गजर करत भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. स्रव भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने योग्य दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनीही मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

श्रावण सोमवारीनिमित्त वैद्यनाथ मंदीरात नाथ प्रतिष्ठानकडून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महादेवाला बेल अधिक प्रिय असल्याने आज बेल आणि फुलांना प्रचंड मागणी हो

ती. वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बेल घेण्याण्यासाठी मंदिर परिसरात बेल-फुलांच्या दुकानावर गर्दी झालेली दिसून आली. सोमवार पहाटेपासूनच दर्शन रांगांमध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.

दरम्यान, रविवारी एकादशी असल्याने दर्शन रांगेत भाविकांची गर्दी होती. सोमवारी सकाळी त्यात आणखी वाढ झाली आहे. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला हे.

प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दुपारी १ वाजेपर्यंत साधारणपणे तीस हजार भाविक भक्तांनी दर्शन घेतले आहे. दर्शन नियोजनासाठी वैद्यनाथ देवल कमिटीचे प्रा.बाबासाहेब देशमुख हे स्वतः लक्ष देऊन होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!