धक्कादायक; पुण्यात मादी श्वानावर तरुणांकडून अत्याचार, अखेर गुन्हा दाखल

पुणे: गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यात एका विकृत तरुणाने श्वानावर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती.त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यातील टिंगरेनगर भागात एका मादी श्वानावर तरुणाने अत्याचार केल्याचा आरोप होत आहे. हा तरुण श्वानाला उचलून एका रुममध्ये घेऊन गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. या तरुणाच्या विरोधात २७ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, होन्नापा अमोधीसिध्द होस्मानि असं त्या व्यक्तीचं नाव आहे.त्याने ७ जुलै रोजी फिरस्त्या कुत्र्याला कारण नसताना मारहाण केली. याबाबत फिर्यादी यांनी त्याला जाब विचारला असता त्याने त्यांच्याशी भांडण केले. ३ ऑगस्ट रोजी फिर्यादी यांच्या आईने पाहिले की, होन्नापा हा एका फिरस्त्या कुत्र्याला उचलुन एका पत्र्याच्या रुममध्ये घेऊन गेला.त्यानंतर त्याने त्या कुत्रीला तिथून सोडून दिले. यावरुन संबंधित व्यक्ती हा मादी कुत्र्यावरती अत्याचार करून तिचा छळ करत असल्याचे दिसून आले. याअगोदर देखील त्या व्यक्तीने मादी कुत्र्यावर अत्याचार करुन त्याचा छळ केलेले असल्याचा संशय फिर्यादी यांना आहे.
दरम्यान फिर्यादी महिला या स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर असून टिंगरे नगर भागातील मास्टर कॉलनी मध्ये त्यांच्या कुटुंबासोबत राहण्यास आहेत. तक्रारदार आणि ॲड रागिणी मोरे यांनी या घटनेचा पाठपुरावा केल्यानंतर विमानतळ पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे