धक्कादायक! “तु वैश्या है, तुझे नंगा करूंगा और व्हिडीओ बनाऊंगा” कदमाकवस्तीत महिलेला शिवीगाळ करून बेदम मारहाण; 8 जणांवर गुन्हा दाखल

लोणी काळभोर : गेल्या काही दिवसांपासून कदमाकवस्तीत महिलांच्या छेडछाडीच्या घटना वारंवार समोर येत असताना आता,शाळेतून मुलीला घरी घेऊन जाणाऱ्या महिलेला रस्त्यात अडवून काही जणांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.त्या महिलेला रस्त्यात अडवून “तु वैश्या है, तुझे नंगा करूंगा और व्हिडीओ बनाऊंगा” असे म्हणून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 8 जणांवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलीला शाळेतून घरी घेऊन फिर्यादी महिला चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून जात असताना, वस्तीमध्ये मोहंमद सैय्यद नुर इराणी, अली अक्रम इराणी, हैदर सलीम इराणी, फातु मंजुर इराणी नुरजान इराणी व तीची दोन मुले हे रस्त्यावरच थांबले होते. त्यावेळी मोहंमद इराणी व अली अक्रम हे दोघेजण फिर्यादी यांच्याकडे पाहुन म्हणाले “तु वैश्या है, तुझे नंगा करूंगा और व्हिडीओ बनाऊंगा असे म्हणुन शिवीगाळ केली. त्यांच्या या सर्व प्रकाराकडे फिर्यादीने दुर्लक्ष केलं. मात्र रस्त्याने जात असताना त्यांना अडवण्यात आलं, “तु ये रोड से आने का नहीं” असे म्हणून फिर्यादी यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्या महिलेचे केस पकडुन, मोहंमद सैय्यद नुर इराणी याने त्यांची ओढणी ओढून इसके कपडे उतार के उसे नंगा करो असे तेथे असलेल्या महिलांना सांगितले. आणि फिर्यादी यांच्या छातीस हात लावून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले. तर इतर सर्व महिलांनी मिळून फिर्यादीचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी तीस वर्षीय पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार मोहंमद सैय्यद नुर इराणी, अली अक्रम इराणी, हैदर सलीम इराणी, फातु मंजुर इराणी, नुरजान इराणी, मोहंमद इम्रान इराणी व मुलगी रबाब इराणी (सर्व रा. पठारे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) या आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 126 (2). 189 (2), 189 (3).190, 79, 44,115(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे करत आहेत.

