धक्कादायक!मुख्याध्यापकांच्या जाचाला कंटाळून १० वीच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल


पुणे :मुरबाड तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या आवारात इयत्ता १०वीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोमल खाकर असं त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. मुख्याध्यापकांच्या मानसिक जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याच प्राथमिक तपासात समोर आल आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार,शहापूर आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मुरबाड तालुक्यातील मोरोशी आश्रमशाळेत कोमळ खाकर ही इयत्ता १०वीत शिकत होती. आज सकाळी गळफास घेऊन तिने आपल आयुष्य संपवलं.याप्रकरणी पोलीस तपास सुरु असून विद्यार्थ्यीनी आश्रमशाळेच्या आवारात गळफास घेते, यावेळी मुख्याध्यापक व अधिक्षक,अधिक्षीका काय करत होते? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे आश्रमशाळेतील वस्तीगृहात मुला, मुलींवर लक्ष देण्यासाठी एक महीला अधिक्षीका व एक पुरूष अधिक्षक या़ची शासनाकडे नेमणूक केली जाते. प्रत्येक आदिवासी आश्रमशाळेत हे नेमणूक केलेली असते, तसेच मुख्याध्यापक देखील आसतो.

       

मात्र असे असताना आश्रमशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी आत्महत्या करतात कसे? मग या आश्रमशाळेतील अधिक्षीका,अधिक्षक व मुख्याध्यापक काय करतात? असा संताप जनक सवाल उपस्थित केला जात आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. आता या प्रकरणी मुख्याध्यापकावर कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!