धक्कादायक! पुण्यातील रेल्वे स्टेशनवर खराब खाद्यपदार्थांची विक्री ; प्रशासनाचा कानाडोळा?


पुणे : मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणारे पुणे स्थानक हे शहरातील एक प्रमुख आणि गर्दीचे स्थानक आहे. दररोज या ठिकाणी सुमारे 150 पेक्षा अधिक गाड्या चालतात आणि दीड लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करत असतात. आता या पुणे रेल्वे स्टेशनवर खराब खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासनाच्या नियमित तपासणीत याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरील काही हॉटेल आणि स्टॉलमध्ये खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवून विक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे. विशेषतहा सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढते, त्या वेळी उघड्यावर अन्नपदार्थ विकणे प्रवाशांच्या आरोग्याशी धोकादायक खेळ ठरत आहे. रेल्वे स्थानकाचे सहा फलाट आहेत, जिथे रेल्वे प्रशासन आणि आयआरसीटीसीने अधिकृत हॉटेल आणि अन्नविक्री स्टॉल नेमले आहेत. नियमांनुसार या स्टॉलवर सर्व आरोग्य आणि सुरक्षा नियम पाळून अन्नपदार्थ विकले जाणे अपेक्षित आहे. मात्र उघड्यावर असणाऱ्या खाद्यपदार्थामुळे प्रवाशाच्या जीवासाठी हा खेळ धोकादायक ठरत आहे.

स्टेशनवरच्या अनेक स्टॉलवर वडापाव, समोसा, बटाटा भाजीसह इतर खाद्यपदार्थ तयार करून उघड्यावर ठेवले जातात. प्रवाशांनी मागणी केल्यास त्याच पदार्थांची विक्री केली जाते, ज्यामुळे हा प्रकार प्रवाशांच्या जीवासाठी धोकादायक ठरतो. हे लक्षात घेऊनही प्रशासनाच्या नियमित तपासणीत हा प्रकार काहीसा दुर्लक्षित होत असल्याचा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!