धक्कादायक! मनोज जरागेंच्या विरोधात पोस्टर टाकणं भोवलं ; त्या व्यक्तीचे कपडे फाडले,काळ फासलं…


पुणे : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे हे त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. जरांगे यांच्या या भूमिकेनंतर राज्यभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान जालना जिल्ह्यात जरांगे यांच्याविरोधात पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीला काळे फासल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

विदूर लाकडे असे काळे फासण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विदूर यांनी मनोज जरंगे यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर जरांगे यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जालना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा राज्यातील वातावरण तापल आहे. या व्यक्तीच्या अंगावरचे कपडे फाडण्यात आले असून त्याला धक्काबुक्की करण्यात आली आहे.

दरम्यान मनोज जरांगे यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत जाऊन आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. काहीही झालं तरी मी मुंबईला जाणारच, असा पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे.जरांगेंनी मुंबईत जाणार असल्याचं सांगितलं असलं तरी मुंबई उच्च न्यायालयाने मात्र त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास नकार दिला आहे. तसेच नवी मुंबई, ठाणे परिसरात आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!