काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द…!
नवी दिल्ली : राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सुरत हायकोर्टाने एका अब्रूनुकसानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली. यामुळे आता अनेक घडामोडींना वेग येणार आहे. गुजरातमध्ये सुरतच्या न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या एका खटल्यात दोषी ठरवलं आहे.
काल मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांनी चोरों का सरनेम मोदी क्यो होता है. असे वक्तव्य केले होते. यामुळे हे आता त्यांच्या अंगलट आले आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का असतं?” ललित, नीरव आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतानाचं वक्तव्य 2019 च्या लोकसभा प्रचारात कर्नाटकमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले होते.
याबाबत गुजरात भाजपा आ. पूर्नेश मोदींनी दाखल केलेली याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सुरत न्यायालयात केस सुरू होती. त्यावर निर्णय आला असून सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं आहे. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे.