धक्कादायक! हळदीच्या कार्यक्रमात नाचताना किरकोळ वादातून खून, घटनेने रायगड हादरलं…


रायगड : लग्नसमारंभातील हळदीच्या कार्यक्रमात डीजेवर नाचताना सुरु झालेल्या किरकोळ वादातून थेट खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

बीड गावातील इस्टूल वाडी येथे नाचण्याच्या प्रकारावरून वाद वाढला आणि एका व्यक्तीचा जीव गमवावा लागला. १४ मे रोजी रात्री इस्टूल वाडी येथे पार पडणाऱ्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात पाहुण्यांनी मोठी गर्दी केली होती.

डीजे सुरू झाल्यानंतर सर्वजण नाचत असताना बाळू मुकणे आणि प्रकाश पवार या तरुणांनी कपडे काढून नाचायला सुरुवात केली. या प्रसंगी महिला उपस्थित असल्याने अनंता वाघमारे आणि विलास वाघमारे यांनी त्यांना तसे न करण्यास सांगितले. मात्र, हे टोचल्याने बाळू आणि प्रकाश संतापले आणि वाद उफाळून आला.

दरम्यान, रागाच्या भरात दोघांनी विलास वाघमारे यांच्यावर हल्ला चढवला. या गोंधळात अनंता वाघमारे यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकाश पवार याने लोखंडी कालथ्याने विलास वाघमारे यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. या गंभीर हल्ल्यात विलास वाघमारे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी बाळू मुकणे आणि प्रकाश पवार घटनास्थळावरून फरार झाले. ग्रामस्थांनी खोपोली पोलिसांना याबाबत तातडीने माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. नाकाबंदी दरम्यान केळवली रेल्वे स्थानकातून बाळू मुकणे याला अटक करण्यात आली. मात्र प्रकाश पवार हा अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले की, प्रकाश पवारला लवकरच अटक करण्यात येईल आणि गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या हळदीच्या कार्यक्रमाने गावी शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!