धक्कादायक!मुंबईत CSMT जवळ ट्रेनला भीषण आग,संपूर्ण डब्बा जळून खाक..


मुंबई : मुंबईतील माटुंगा कारशेडमध्ये सीएसएमटीजवळ रेल्वे डब्ब्याला भीषण आग लागली असल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे. ही आग इतकी भीषण होती की, या आगीत संपूर्ण डबा जळून खाक झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील माटुंगा कारशेड मधील CSMT बाजूच्या शौचालयात वेल्डिंगचे काम सुरू होते. ही वेल्डिंग सुरू असताना एक ठिणगी मध्य रेल्वेवर गेली अन् आगीचा भडका उडाला. आग झपाट्याने वाढत गेल्याने संपूर्ण डब्बा जाळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान आग लावली की लागली? याचा तपास केला जात आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत जळणारा डबा तातडीने मोकळ्या जागेत ढकलला. त्यामुळे शेजारील इतर डबे आणि वर्कशॉपच्या पायाभूत सुविधांना आगीची झळ बसली नाही.
सुदैवाने कारशेडमधील इतर गोष्टींचे नुकसान झाले नाही.

दरम्यान, वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पण मनसे कामगार सेनेने या घटनेवर संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.ही आग लागली की लावली गेली? असा खळबळजनक सवाल मनसे कामगार सेनेचे चिटणीस अनिश खंडागळे यांनी उपस्थित केला आहे.

कारशेडमधील सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. प्राथमिक तपासात वेल्डिंग हेच कारण समोर येत असले तरी, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!