दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात धक्कादायक वस्तू! साडी, गर्भनिरोधक गोळ्या, पाकिटे अन्…

नाशिक : नाशिक शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहरातील दहावीच्या काही परीक्षा केद्रांवर पेपरच्या अखरेच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या दप्तरात रोख रकमेसह प्रेमपत्रे, नवी साडी, हिरवा चुडा, फायटर, चाकू, भेटवस्तू आणि गर्भनिरोधकांची पाकिटे आढळली आहेत. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

काही शाळांनी आवारात ठेवलेली दप्तरे अचानक तपासली गेली. यामुळे नको त्या वस्तू सापडल्याने शिक्षकही चक्रावले आहेत. याबाबत तपास सुरू आहे. कमी वयात गर्भनिरोधक गोळ्या नेमक्या कशासाठी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मुला-मुलींची पत्रे, नवीन कपडे, हिरवा चुडा, सोन्याची बाळी, गर्भनिरोधकाची पाकिटे, मेकअपचे साहित्य, फायटर, चाकू, सापडले आहेत.
तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू, अशा वस्तू दप्तरांमध्ये सापडल्या. काही केंद्रांवर शिक्षकांनी पुढाकार घेऊन अचानकपणे दप्तरांची तपासणी केली. दप्तरांची अशी झडती घेतली जाईल, याची विद्यार्थ्यांना कल्पना नव्हती. या तपासणीत उघडकीस आलेल्या गोष्टींमुळे परीक्षा संपल्यानंतर वेगळ्या पद्धतीने मुलं आनंद साजरा करणार होते, असेही पुढे आले आहे.

याबाबत पालकांना माहिती देण्यात आली आहे. काही शाळांनी पोलिसांपर्यंत जाणेही टाळले. काही मुलांना समुपदेशनाची गरज असल्याचेही अधोरेखित झाले. शिक्षकांच्या अशा पुढाकारामुळे काही मुला-मुलींसोबत होणारे गैरप्रकार निश्चितच टळले आहेत.
परंतु आता या मुलांना पालकांनी संवेदनशीलपणे हाताळायला हवे, सध्या परिस्थिती बिघडली आहे. यामुळे मुलांकडे लक्ष देण्याची गरज असून अगदी लहान वयात मुलांना अनेक व्यसन लागत असून आता परिस्थिती खूप भयंकर बनली आहे.