पुणे जमीन घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती ; मामेभावावर गुन्हा दाखल, पण पार्टनर असूनही पार्थ पवाराचं नाव वगळलं….


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.या प्रकरणाबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.मुंढवा परिसरातील जमिनीच्या व्यवहारावर प्रकरणी आता तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, यामध्ये पार्टनर असूनही पार्थ पवार यांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना पाठीशी घातलं जात असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार,पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित या व्यवहारात शासनाच्या मुद्रांक शुल्कात फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आली असून, त्यावरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सह जिल्हा निबंधक (वर्ग 1) संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीत जमीन विक्रेत्या शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांची नावे नमूद आहेत. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पार्थ पवार हे पार्टनर असूनही त्यांना वगळण्यात आल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान शीतल तेजवानी या संबंधित जमिनीच्या पॉवर ऑफ अटर्नी धारक आहेत. त्यांनी जमीन विक्रीची प्रक्रिया पूर्ण केली असून खरेदीदार म्हणून दिग्विजय पाटील यांनी दस्त नोंदवला. मात्र, व्यवहारात अपेक्षित मुद्रांक शुल्क न भरल्याने शासनाला आर्थिक तोटा झाला, अशी नोंद तक्रारीत करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, या संपूर्ण व्यवहाराशी अमेडिया कंपनीचा संबंध असून कंपनीचे संचालक पार्थ पवार आहेत. तरीदेखील त्यांच्याविरोधात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. यामुळे एका भागीदारावर कारवाई होत असताना दुसरा भागीदार तपासाच्या कक्षेबाहेर का ठेवला गेला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सगळ्या प्रकरणात पार्थ पवार यांना वाचवलं जात आहे का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!