2016 मध्ये 2 हजारची नोट छापायला मोदींचा विरोध होता! धक्कादायक माहिती आली समोर

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी २०१६ मध्ये नोटाबंदी झाली तेव्हाही २००० च्या नोटा आणण्याच्या बाजूने नव्हते, कारण त्यांना वाटत होते की दैनंदिन व्यवहारानुसार हे योग्य नाही. असे वक्तव्य प्रधान सचिव असलेले नृपेंद्र मिश्रा यांनी केले आहे.
तसेच नृपेंद्र मिश्रा यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली असून हा केवळ झाकाझाक करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेने गेल्या शुक्रवारी (ता.१९) एक अधिसूचना जारी करून २००० च्या नोटा चलनातून वगळण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव आणि वरिष्ठ अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांच्या दाव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जयराम रमेश यांनी ट्विट करून लिहिले की, ‘पंतप्रधानांचे माजी उच्च सहाय्यक म्हणत आहेत की स्वयंघोषित विश्वगुरुंनी नोव्हेंबर २०१६ मध्येच २००० च्या नोटेला विरोध केला होता. ते पुढे म्हणतील की त्यांच्या सल्लागारांनी त्यांच्यावर नोटाबंदीसाठी दबाव टाकला होता. हा प्रकार बाकी काही नसून झाकण्याचा दयनीय प्रयत्न आहे.