ओडिसा रेल्वे अपघाताबाबत धक्कादायक माहिती आली समोर, इंटरलॉकिंग सिस्टममध्ये बदल केल्याचा मिळाला पुरावा..

ओडिसा : ओडिसामध्ये नुकताच एक मोठा रेल्वे अपघात झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. असे असताना रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवण्यावर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

पुणे शहर परिसरात आज जोरदार पावसाचा इशारा
प्राथमिक तपासात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचा पुरावा मिळाला आहे. त्यानंतर रेल्वेने सीबीआय तपास करण्याची शिफारस केली. यामुळे तपासाला गती मिळणार आहे.

प्राथमिक तपासात दावा
प्राथमिक तपासानंतर ओडिशामधील अपघातामागे सिग्नल प्रणालीत केलेला बदल हे अपघाताचे कारण असल्याचे मानले जात आहे. यावर अजूनही चौकशी सुरू आहे.
शिंदे-फडणवीस सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना फसवी; नाना पटोलेंचा घणाघात
यामुळे रेल्वेने स्टेशन रिले रूम आणि कंपाऊंड हाउसिंग सिग्नलिंग उपकरणांच्या सुरक्षेसाठी सर्व विभागीय मुख्यालयांना अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच एक सुरक्षा मोहीम देखील सुरू केली आहे, ज्यामध्ये दुहेरी लॉकिंग व्यवस्थेचा समावेश आहे.
मान्सूनचा मुहूर्त हुकला! २०१८ नंतर पहिल्यांदाच १० जून नंतर मान्सूनचं होणार आगमन, काळजी वाढली..
दरम्यान, या तिहेरी अपघातात अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले. चार डब्बे रेल्वे बाँड्रीच्या बाहेर गेले. एकूण 15 डब्बे पटरीच्या बाहेर होते.