मोठी बातमी! अजितदादांच्या विमान अपघाताची धक्कादायक माहिती समोर, आता वेगळाच व्हिडिओ आला समोर…

पुणे : अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांचे विमान कोसळले त्याचे अनेक व्हिडीओ समोर आले. पण आता असा एक व्हिडीओ समोर आला आहे जो इतर व्हिडीओ पेक्षा वेगळा आहे. अजित पवार यांच्या प्रवासादरम्यान बारामती येथे उतरतानाच विमान कोसळले आणि त्यात त्यांच्यासह सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक व्हिडीओ आता समोर आल्याने चर्चेला नवे वळण मिळाले आहे. मुंबईहून बारामतीकडे येताना अजित पवार यांचे विमान लँडिंग प्रक्रियेत असताना अनपेक्षित अडचण निर्माण झाली.
धावपट्टीवर उतरण्याच्या क्षणी वैमानिकाचे नियंत्रण सुटल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे. विमानाचा तोल गेल्यानंतर ते थेट जमिनीवर आदळले. जमिनीवर आपटताच प्रचंड स्फोट झाला आणि काही क्षणांतच संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर आतापर्यंत दोन व्हिडीओ सार्वजनिक झाले होते. त्यातील एका दृश्यात विमान हवेत असतानाच एका बाजूला झुकल्याचे दिसत होते. त्यामुळे अपघाताच्या कारणांबाबत विविध तर्क वितर्क लावले जात होते. आता समोर आलेल्या नव्या व्हिडीओमुळे घटनेच्या क्षणांचे आणखी तपशील समोर येत आहे.
नवीन व्हिडीओमध्ये अपघात घडल्यानंतर काही मिनिटांतच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याचे दिसते. विमान कोसळल्यानंतर झालेल्या प्रारंभिक स्फोटानंतर भीषण आग लागली होती. मात्र आग धगधगत असतानाच पुन्हा एकदा मोठा स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या दुसऱ्या स्फोटाचा आवाज व्हिडीओमध्ये स्पष्ट ऐकू येतो.