अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती समोर, संशय वाढला दोन्ही पायलट…

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघातानंतर अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत. तसेच आता अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीने आता वेग घेतला आहे.

मंत्री, आमदार, खासदार सर्वांकडूनच अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तपास यंत्रणांकडून या विमान अपघाताचा तपास केला जात असून ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला आहे. फ्लाइट रेकॉर्डरमधील डाटा डाऊनलोड करण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, सुरूवातीला सांगितले गेले की, फ्लाइट रेकॉर्डर बराचवेळ तीव्र उष्णतेत असल्याने नुकसान झाले. नवीन माहितीनुसार, डाटा डाऊनलोड झाला आहे, यातून मोठी माहिती पुढे येऊ शकते.

आमदार अमोल मिटकरी अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सातत्याने संशय व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामध्येच त्यांनी आता नवीन प्रश्न उपस्थित केला. त्या विमानासाठी अगोदर नियुक्त असलेले पायलट आता कुठे आहेत? असा प्रश्न त्यांनी केला.
अमोल मिटकरी यांनी म्हटले की, अजितदादांच्या विमानासाठी नियुक्त पायलट यश आणि साहिल मदन आता कुठे आहेत? ही दोन्ही पायलट अगोदर अजित पवार यांच्या विमानावर नियुक्त होते. २८ जानेवारी २०२६ रोजी तेच अजित पवार यांच्या विमानाचे पायलट होते पण अचानक पायलट बदलण्यात आली. आता ही पायलट नेमकी कुठे आहेत? याबाबतची माहिती द्यावी, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.