पुण्यात क्लास वन अधिकाऱ्याचे धक्कादायक कांड ; स्पाय कॅमेराने पत्नीचेच आंघोळ करतानाचे व्हिडिओ काढले अन केलं ब्लॅकमेल..


पुणे : पुण्यासह राज्यभरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पुण्यात चक्क क्लास वन ऑफिसर असलेल्या पतीने आपल्याच क्लास वन ऑफिसर असलेल्या पत्नीचा घरातच स्पाय कॅमेरे लावून अंघोळीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, क्लास वन अधिकारी असणाऱ्या पतीकडून पत्नीवर चारित्र्यविषयी संशय घेत वारंवार शिवीगाळ, अपमान आणि मारहाण केली जात होती. याशिवाय पतीने घरात गुप्तपणे स्पाय कॅमेरे लावून तिच्या आंघोळीचे आणि इतर खाजगी क्षणांचे व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करून ठेवले होते. तसेच ही व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने दीड लाख रुपये आणि कारच्या हफ्त्यांसाठी पैसे माहेरून आणण्याची सक्ती देखील केली होती.या प्रकरणी 30 वर्षीय पत्नी आणि महिला क्लास वन ऑफिसरने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता याप्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह महिलेच्या सासरच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात सासू, सासरा, दीर आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे. 2020 साली या अधिकारी महिलेचं लग्न झालं होतं. दोघांचा संसार सुखाचा सुरु होता. मात्र काही काळापूर्वी ऑफिसर पतीला पत्नीवर संशय आला. त्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. वारंवार पैशांची मागणी सुरु होती. तसेच त्याने पत्नीवर नजर ठेवण्यासाठी घरात स्पाय कॅमेरेदेखील घरात बसवून घेतले होते. या प्रकरणामुळे पुणे हादरले असून जिल्ह्यासह राज्यात हा चर्चेचा विषय ठरत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!