खेळता-खेळता घडलं धक्कादायक! प्लास्टिकचा बॉल गिळला, दीड वर्षांच्या चिमुकलीचा तडफडून मृत्यू, कुटुंबाचा एकच आक्रोश…

गांधीनगर : खेळता खेळता एका दीड वर्षांच्या चिमुकलीने प्लास्टिकचा चेंडू गिळल्याने मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तिचा मृत्यू झाला. यामुळे कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. याबाबत लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.
राजकोटमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. पार्थवी चावडा असे या मुलीचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, दीड वर्षांची मुलगी पार्थवी घरात खेळत होती. पार्थवीने खेळता खेळता प्लास्टिकचा चेंडू गिळला, कुटुंबीयांना तिला नेमक काय झालंय हेच लवकर समजलं नाही. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यामुळे कुटूंबाने एकच आक्रोश केला. चेंडू गिळल्यानंतर पार्थवीची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी तिला तातडीने जनाना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. तिचा मृत्यू झाला होता.
रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने राजकोट पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आवश्यक कायदेशीर कारवाई केली. या घटनेमुळे लहान मुलांची किती काळजी घ्यावी लागते, याचा प्रत्येय आला आहे. लहान मुलांना खेळायला देताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
याबाबत डॉक्टरांनी सांगितले आहे की, निष्काळजीपणामुळे अशा घटना घडू शकतात, त्यामुळे पालकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. छोटीशी चूक देखील महागात पडू शकते. यामुळे याबाबत पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.