धक्कादायक ; महिला कॉन्स्टेबलला शिपाई नवऱ्यानं शेतात नेलं अन डोक्यात घातला रॉड…


पुणे : राज्यात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच आता महिला कॉन्स्टेबलच्या शिपाई नवऱ्यानचं तिची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.बाराबंकी मसौली पोलीस स्टेशन परिसरातील महिला कॉन्स्टेबल विमलेश पाल यांचा संशयास्पद मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास करीत गुन्ह्याचा छडा लावला आहे. आरोपी पतीने कॉन्स्टेबल पत्नीला शेतात उतरताच तिच्या डोक्यात रॉड घातला. यात त्या रक्तबंबाळ होऊन खाली कोसळल्या. रक्त जास्त प्रमाणात वाहिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महिला कॉन्स्टेबलच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती पोलीस कर्मचारी इंद्रेश मौर्य याला अटक करून तुरूंगात धाडले आहे. पोलिसांनी या प्रकरणात हत्येत वापरलेली लोखंडी रॉड, मृताची पर्स आणि कार जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ सालापासून मृत महिलेचे शिपाईसोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतर आरोपी मृत महिलेला पत्नीचा दर्जा देत नव्हता. दोघांमध्ये अनेकदा वादविवाद झाले. दरम्यान घटनेच्या दिवशी आरोपी पतीने कॉन्स्टेबल पत्नीला शेतात नेऊन संपवले.

दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला ताब्यात घेतले असून, त्यानं हत्या करण्यासाठी वापरलेली शस्त्र देखील जप्त केली आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!