धक्कादायक! विक्रोळीत घरावर दरड कोसळून बाप -लेकीचा मृत्यू, आई मुलगा जखमी..


मुंबई : मुंबई पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्कसाईट भागात मुसळधार पावसामुळे घरावर दरड कोसळून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये सुरेश आणि शालू मिश्रा या बापलेकीचा समावेश आहे, तर मायलेक आरती आणि ऋतुराज मिश्रा या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. याशिवाय आजूबाजूच्या घरातील दोघा जणांनाही दुखापत झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीच वातावरण पसरल आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर उपनगरासह परिसरातील ठाणे, कल्याण,डोंबिवली,बदलापूर, वसई -विरार,वाशी पनवेल या भागात मुसळधार पाऊस झाला. अशातच मुंबई पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्कसाईट भागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. रात्री दोन वाजताच्या सुमारास एका घरावर दरड कोसळून एकाच कुटुंबातील दोघा जणांचा मृत्यू झाला, तर दोघं जण गंभीर जखमी झाले आहेत.मृतांमध्ये सुरेश आणि शालू मिश्रा या बापलेकीचा समावेश आहे, तर मायलेक आरती आणि ऋतुराज मिश्रा जखमी आहेत. याशिवाय आजूबाजूच्या घरातील दोघा जणांनाही दुखापत झाली आहे.मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच पाचारण करण्यात आले. त्यांनी बचावकार्य हाती घेतले असून चौघा जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेनंतर आजूबाजूची घरं रिकामी करण्याचे काम सुरु आहे. मुंबई महापालिकेने डोंगर किनाऱ्यावरील भाग धोकादायक असल्यामुळे येथील घरात न राहण्याची नोटीस मिश्रा कुटुंबाला बजावली होती, अशी प्राथमिक माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!