पुणेकरांनो सावधान! GBS बाबत धक्कादायक माहिती, फक्त ‘या’ लोकांना होतेय आजाराची लागण, जाणून घ्या…

पुणे : मागील अनेक दिवसांपासून राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे या दुर्मिळ आजारांचे रुग्ण आढळत आहेत. यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. जीबी सिंड्रोमच्या रुग्णात वाढ झाली आहे. पुण्यामध्ये या आजाराचे अधिक रुग्ण आढळत आहेत.

या उद्रेकानंतर आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर पुण्यात काम करतेय. संशयित रुग्णांचा शोध घेतेय,पाण्याचे आणि रुग्णांची तपासणी करून नमुने तपासते आहे. यासोबत या आजाराचा नेमका उगम कुठून झालाय? याचा शोध घेतेय. या दरम्यान जीबीएसबाबत एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहेत. यामुळे पुणेकरांनो मोठा झटका बसणार आहे.
खरं तर जीबीएसचे रुग्ण पाहिले असता, सरसकट हा आजार लहानग्यांपासून ज्येष्ठांना होतोय. कारण जीबीएसची लागण झालेले अल्पवयीन रूग्णही सापडले होते आणि ज्येष्ठ नागरीक देखील सापडले होतेय. त्यामुळे हा आजार सरसकट सगळ्यांनाच होतोय, असा कयास अनेक तज्ज्ञांनी मांडला होता.

मात्र आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार जीबीएस आजार कोणताही आजार नसलेल्या व्यक्तींना होतोय. म्हणजेच ज्या व्यक्तींना कोणताच आजार नाहीये,त्यांना हा जीबीस टार्गेट करतोय.
दरम्यान, पुणे शहरातील जीबीएसच्या प्रादुर्भावाच्या व्यवस्थापनासाठी स्थापन केलेल्या रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरटी) ने केलेल्या अधिकृत डेटाच्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. कोणताही अंतर्निहित सह-रोग नसलेले लोक गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे, सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी कोणताही आजार नसलेल्या निरोगी व्यक्तींना देखील खबरदारीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.