डॉक्टर तरुणीचा शेवटच्या क्षणाची धक्कादायक माहिती अखेर समोर ; तरुणीचा लटकवलेल्या ओढणीचा एक सेल्फी, एक फोटो बनकरला…

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे नोकरी करत असलेल्या डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत.या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिने टोकाचे पाऊल उचलण्याआधी लटकवलेल्या ओढणीचा एक फोटो,आरोपी प्रशांत बनकरला पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे.

डॉक्टर महिलेने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी बनकर याला गळपास घेण्यासाठीच्या ओढणीसोबत सेल्फी फोटो का पाठवला होता, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या बाजू लक्षात घेऊन तपास करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आता पोलिसांच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली आहे. डॉक्टर महिलेने फलटण येथील मधुदीप हॉटेलमध्ये चेकईन केल्यानंतर तिने प्रशांत बनकर याच्याशी संभाषण केले होते. तिचा शेवटचा कॉल हा बनकर यालाच होता, असे म्हटले जात आहे. एक सेल्फी फोटो डॉक्टर महिलेने बनकर याला व्हॉट्सअॅपद्वारे पाठवला होता. त्यामुळे आता या प्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे.

दुसरीकडे डॉक्टर महिलेच्या शवविच्छेदन अहवालात तिचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले असून शरीरावर अन्यत्र कुठेही जखमा नाहीत, असेही नमूद करण्यात आले आहे. या सर्व माहितीनंतर डॉक्टर महिलेच्या आत्महत्येचे नेमके कारण काय आहे? या प्रश्नाचे उत्तर अद्याप समजू शकलेले नाही.

